शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीचा एकच अर्ज कायम ठेवा; अन्यथा सर्वच बाद होतील

By दिनेश पठाडे | Updated: May 10, 2024 17:46 IST

जिल्ह्यातील ३४२ उमेदवारांना हमीपत्र द्यावे लागणार

दिनेश पठाडे, वाशिम : सन २०२२-२३ या वर्षातील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित अर्जदाराला एकाच घटकांसाठी एकच आवेदन अर्ज ग्राह धरण्याबाबतचे आणि इतर आवेदन रद्द करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. अन्यथा सर्वच अर्ज बाद होणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविणकुमार पडवळ यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती-२०२३ करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. अशी तरतूद करण्यात आली आहे होती, परंतु काही उमेदवारांनी एका पर्यायाकरिता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकच ग्राह्य धरून इतर घटकांतील आवेदन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी उमेवादारांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहेत. ज्या पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील उमेदवारांनी एकापेक्षा एक अर्ज भरले आहेत, त्यांना याबाबत कळविण्यात आले आहे.

उमेदवार ज्या पोलिस हद्दीत राहत आहेत, त्या पोलिस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन फक्त एकाच घटकांसाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र स्व-हस्तक्षरात भरून द्यावे लागणार आहे. १७ मेपर्यंत संबंधित पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या मुदतीत सदरची कार्यवाही न केल्यास त्यानंतर त्यांचे सर्व आवेदन अर्ज बाद करण्यात येणार आहेत.

वाशिम जिल्ह्यातील ३४२ जणांचे एकापेक्षा अधिक अर्ज

वाशिम जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या एकूण ६८ पोलिस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ३४२ उमेदवारांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच घटकांसाठी एकापेक्षा अधिक अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडून एकच आवेदन ग्राह्य धरणे व इतर सर्व ठिकाणचे आवेदन रद्द करण्याबाबतचे हमीपत्र भरून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Policeपोलिस