शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : रिसोड मतदारसंघात शिवसंग्रामचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:07 IST

रिसोड मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामच्या इच्छूकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामच्या इच्छूकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे त्यामुळे शिवसंग्रामची नाराजी कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपा उमेदवाराचा सलग तीन निवडणुकीत पराभव झाल्याने या मतदारसंघावर शिवसेनेबरोबरच शिवसंग्रामने दावा केला होता. त्या अनुषंगाने शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी गत दोन महिन्यात तीन वेळा मतदारसंघाचा दौरा करून चाचपणीही केली होती.रिसोड व मालेगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन इच्छूक उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि इतर पक्षातील नाराज मंडळीला शिवसंग्राममध्ये प्रवेश देत इच्छूक तयारीला लागले होते.मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व भाजपातील अंतर्गत बंडाळीचा ऐनवेळी दगाफटका बसू नये म्हणून शिवसंग्रामच्या इच्छूकांनी सर्वांशीच संवाद साधण्यावर भर दिला होता. अखेरच्या क्षणी रिसोड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसंग्रामचा चांगलाच हिरमोड झाला आहे. रविवार, २९ सप्टेंबर रोजी रिसोड मतदारसंघासाठी शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाल्याचे निश्चित झाल्यानंतर, शिवसंग्रामच्या इच्छूकांनी त्यांची प्रचारयंत्रणाही थांबविली आहे.गतवेळीदेखील शिवसंग्रामला ऐनवेळी हुलकावणी मिळाल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे शिवसंग्रामची नाराजी कायम राहणार की नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश मिळणार, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :washimवाशिमrisod-acरिसोडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019