टेभूर्णा घटनेच्या चौकशीसाठी मंगरुळपीरातील वडार समाज आकम्रक; तहसीलदारांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 21:11 IST2018-02-06T21:08:47+5:302018-02-06T21:11:45+5:30
मंगरुळपीर: लातूर जिल्ह्यातील टेभूर्णा येथील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तलावात बुडवून मारून टाकल्याची घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. संदर्भात ६ फेब्रुवारीला वडार समाज संघाच्या वतीने मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

टेभूर्णा घटनेच्या चौकशीसाठी मंगरुळपीरातील वडार समाज आकम्रक; तहसीलदारांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: लातूर जिल्ह्यातील टेभूर्णा येथील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तलावात बुडवून मारून टाकल्याची घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणाची चौकशी संथगतीने होत असल्याने वडार समाजाने आक्रमक पावित्रा घेतला असून, या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात ६ फेब्रुवारीला वडार समाज संघाच्या वतीने मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, लातूर जिल्ह्यातील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेतील आरोपीना अटक करण्यात पोलीस हलगर्जीपणा करीत आहेत. या घटनेत काही धनदांडग्यांचा सहभाग असल्याची शक्यता असून, या घटनेचा आम्ही निषेध करतो. या घटनेतील दोषींना पाठिशी घालणाºया पोलीस अधिकाºयांना निलंबित करावे, घटनेची सीबीआयमार्फत न्यायालयीन चौकशी करावी, मारेक-यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवावा अशा मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर संघटनेचे महादेव कुसळकर, सुखदेव फुलारे, मुकुंदराव दाते, संजय कोंबेकर, किसन पिटकर आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.