लक्झरी व ट्रेलरचा अपघात
By Admin | Updated: July 6, 2017 14:37 IST2017-07-06T14:37:12+5:302017-07-06T14:37:12+5:30
यामध्ये लक्झरीमधील ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झालेत.

लक्झरी व ट्रेलरचा अपघात
शिरपूर जैन : नागपूर - औरंगाबाद दृतगती मार्गावर लक्झरी व ट्रेलरचा अपघात झाल्याची घटना ६ जुलै रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान चांडस फाटयानजिक घडली. यामध्ये लक्झरीमधील ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झालेत.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर -औरंगाबाद द्रृतगती मार्गावर पुण्याकडून येणाऱ्या लक्झरी बस व मेहकरकडे जाणाऱ्या ट्रेलरचा चांडस फाटयानजिक समोरासमोर धडक झाली. लक्झरीमध्ये जवळपास २० ते २५ प्रवासी प्रवास करीत होते. वाहनांची धडक जबर असल्याने वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असले तरी प्रवाशांना मात्र जास्त मार लागला नाही. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक कमलेश खंडारे यांना मिळाल्याबरोबर त्यांनी घटनास्थळ गाठले. अपघातात वाहनांचे मोठया प्रमााणत नुकसान झाले असून प्रवासी सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली.