नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे अतोनात नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 14:35 IST2019-01-05T14:34:42+5:302019-01-05T14:35:04+5:30
शिरपूरपासून जवळच असलेल्या किनखेडा परिसरात नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे सकाळ व सायंकाळच्या अती थंडीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे अतोनात नुकसान!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यात कधी नव्हे एवढी थंडी यावर्षीच्या हिवाळ्यात जाणवत असून यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दुसरीकडे शेतांमधील पिकांवरही वाढत्या थंडीने संकट ओढवले असून शिरपूरपासून जवळच असलेल्या किनखेडा परिसरात नदीकाठच्या शेतातील हळद पिकाचे सकाळ व सायंकाळच्या अती थंडीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
किनखेडा या गावातील शेतकरी हळदीचे विक्रमी उत्पन्न घेतात. पोषक हवामानामुळे यापासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकºयांची आर्थिक स्थिती देखील सुधारली आहे. यंदा मात्र वाढत्या थंडीमुळे होत्याचे नव्हते झाले असून हळद पीक वाढीच्या अवस्थेतच करपायला लागले आहे. त्याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संबंधित शेतकºयांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.