लोकमत इम्पॅक्ट ! लघुव्यावसायिक, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविले, रस्ता मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:03 IST2018-09-06T15:02:11+5:302018-09-06T15:03:29+5:30
शहरातील सर्वात रहदारीच्या पाटणी चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते व काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतीने

लोकमत इम्पॅक्ट ! लघुव्यावसायिक, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविले, रस्ता मोकळा
वाशिम - शहरातील सर्वात रहदारीच्या रस्त्यावर लघुव्यावसायिक, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक विस्कळीत होत होती. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित करताच हे अतिक्रमण 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान हटविण्यात आले आहे. यापूर्वीही अतिक्रमण हटविण्यात आले असून नियमित याकडे लक्ष ठेवल्यास या मोहिमेचा फायदा होवू शकतो, अशी प्रतिक्रीया नागरिकांत उमटत आहे.
शहरातील सर्वात रहदारीच्या पाटणी चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते व काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतीने वेळोवेळी राबविण्यात येते. मात्र, कारवाई नंतर परिस्थीती जैसे थे होत आहे. 6 सप्टेंबर रोजीही शहर वाहतूक शाखेच्यावतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. ही कारवाई झाल्याबरोबर काही वेळातच रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणात फेरीवाले, भाजीवाले येवून बसत असल्याने या रस्त्यावर नियमित कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. यासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तांची काँग्रेस कमेटीच्यावतीने दखल घेवून जिल्हाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. रस्ता मोकळा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
शहर वाहतूक शाखेचा नुकताच पदभार मी स्विकारला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी व्यापाऱ्यांना, फेरीवाल्यांना व रस्त्यावर बसणाऱ्या लघुव्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. नगरपरिषदेने लघू व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करुन दिल्यास हा प्रश्न त्वरित निकाली निघू शकतो. नगरपालिकेचे व नागरिकांचे सहकार्य लाभल्यास रस्त्यावरील वाहतूक समस्येचा प्रश्न निकाली निघण्यास वेळ लागणार नाही. मी 6 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेटून वाहतूक विस्कळीत होणार नाही, याबाबत सर्वांना सूचना केल्या आहेत. याउपरही कोणी नियमांचे भंग करेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- विनायक जाधव
शहर वाहतूक शाखा निरिक्षक, वाशिम
/>