बसस्थानकातील हिरकणी कक्ष कुलूपबंद
By Admin | Updated: October 22, 2014 00:24 IST2014-10-22T00:24:24+5:302014-10-22T00:24:24+5:30
बसस्थानकावर सुरू केलेला हिरकणी कक्ष दिवसरात्र कुलुपबंदच असतो.

बसस्थानकातील हिरकणी कक्ष कुलूपबंद
वाशिम : भुकेल्या तान्हुल्याला स्तनपान देतांना मातांची होणारी कुचंबणा रोखण्याचा गाजावाजा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्थानिक बसस्थानकावर सुरू केलेला हिरकणी कक्ष दिवसरात्र कुलुपबंदच असतो. परिणामी, महामंडळाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासल्या जात असुन मातांची कुचंबना अद्यापही सुरूच आहे. . बसस्थानकाच्या दर्शनी भागात हिरकणी कक्षाची कॅबिन तयार करण्यात आली आहे. .या विशेष कक्षात महिलांना बसण्याची व्यवस्था, पंखा, आदी व्यवस्था करण्यात आली आहे. बालकांच्या छायाचित्रांनी हा कक्ष सजविलेला असला तरी सद्यस्थितीत हा कक्ष कुलूपबंद राहत आहे.