बीटी वाणांंचा दर्जा तपासण्यासाठी ‘लाइव्ह सॅम्पल’ संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:36 IST2018-09-07T14:34:02+5:302018-09-07T14:36:55+5:30

बियाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून (लाइव्ह सॅम्पल) नमुने संकलित केली जात आहेत.

 Live samples collection to check quality of Bt varieties | बीटी वाणांंचा दर्जा तपासण्यासाठी ‘लाइव्ह सॅम्पल’ संकलन

बीटी वाणांंचा दर्जा तपासण्यासाठी ‘लाइव्ह सॅम्पल’ संकलन

ठळक मुद्देया नमुन्यांची नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत गुणनियंत्रक विभागाच्या मार्गदर्शनात पानांचे नमुने घेण्यात येत आहेत.

- दादाराव गायकवाड

वाशिम : यावर्षी सर्व उपाययोजना करू नही राज्यातील कापूस पट्ट्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने बीटी बियाण्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. म्हणूनच या बियाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून (लाइव्ह सॅम्पल) नमुने संकलित केली जात आहेत. या नमुन्यांची नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत गुणनियंत्रक विभागाच्या मार्गदर्शनात पानांचे नमुने घेण्यात येत आहेत.
कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर झाला आहे. प्रमाण कमी असले, तरी बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होणे, ही बाब गंभीर आहे. या प्रकारामुळे बीटी बियाण्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा १८ हजारांहून अधिक क्षेत्रात कपाशीची लागवड झाली असून, प्रत्येकच तालुक्यात कपाशीवर बोंडअळीचा कमीअधिक प्रादुर्भाव दिसत आहे. यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापि, बोंडअळीचा प्रादुर्भाव नेमका का होत आहे. या कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना पत्र पाठवून आता कपाशीच्या झाडांचे लाइव्ह सॅम्पल संकलित करून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत गुणनियंत्रक विभागाच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांसह किमान १० जणांच्या चमूकडून कपाशीच्या झाडांची पाने तोडून त्यांचे नमुने तयार करण्यात येत आहेत.

कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव ही एक गंभीर समस्या झाली आहे. प्रादुर्भावाची नेमकी कारणे शोधण्यासाठी प्रयोग शाळेत तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात कपाशीच्या झाडांची पाने तोडून ‘लाइव्ह सॅम्पल’ संकलित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. घेतलेले सॅम्पल संकलित करून २४ तासांच्या आत नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
-डी. आर. साठे
जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी (कृषी)
वाशिम)

 

 

Web Title:  Live samples collection to check quality of Bt varieties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.