लक्ष्मीनारायण मिश्रा  वाशिमचे  नवे जिल्हाधिकारी; राहुल व्दिवेदी अहमदनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 17:46 IST2018-04-16T17:46:30+5:302018-04-16T17:46:30+5:30

Laxminarayan Mishra New Collector of Washim; Rahul Videvadi goes Ahmednagar | लक्ष्मीनारायण मिश्रा  वाशिमचे  नवे जिल्हाधिकारी; राहुल व्दिवेदी अहमदनगरला

लक्ष्मीनारायण मिश्रा  वाशिमचे  नवे जिल्हाधिकारी; राहुल व्दिवेदी अहमदनगरला

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांची अहमदनगरला जिल्हाधिकारी म्हणूनच बदली झाली आहे. रिक्त झालेल्या पदावर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची वर्णी लागली आहे.  जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी तीन वर्षांपूर्वी वाशिमच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतली होती.

वाशिम : राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश १३ एप्रिल रोजी पारित झाले. येथील जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही त्या यादीत समावेश असून त्यांची अहमदनगरला जिल्हाधिकारी म्हणूनच बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची वर्णी लागली आहे.  जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी तीन वर्षांपूर्वी वाशिमच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय कामकाज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. जलयुक्त शिवार अभियान, दत्तक ग्राम भामदेवीमधील वृक्ष लागवड, लॅण्ड बँक सिस्टीम यासह शासनाच्या असंख्य उपक्रमांना त्यांनी यशस्वी करून दाखविले. तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची प्रशासकीय बदली झाली असून ते अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून आता सूत्र हाती घेणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची वाशिमचे नवे जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली असून ते येत्या दोन ते तीन दिवसांत रुजू होतील, अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली आहे. 

Web Title: Laxminarayan Mishra New Collector of Washim; Rahul Videvadi goes Ahmednagar