नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:30 IST2018-01-29T19:27:54+5:302018-01-29T19:30:07+5:30
मालेगाव : नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले.

नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले.
नाफेडद्वारा तुर खरेदीसाठी आॅनलाईन प्रक्रिया दोन महिन्यापासून सुरू करूनही अद्यापही कुठल्याच प्रकारे तुर खरेदी नाफेडद्वारा सुरू करण्यात आली नाही. यामुळे शेतक-यांवर अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत शेती पिकवावी लागते. नाफेड केंद्र सुरू नसल्याने शेतकरी कमी भावात तूर विक्री करीत आहे. घरामध्ये तुरीचे पीक येऊन पडले की बाजारभाव कोलमडतात, याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निवेदनाची प्रत जिल्हाधिका-यांना सुद्धा पाठविण्यात आली.
नाफेड तूर खरेदी कधी सुरु होणार याकडे सर्व तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागून आहे. ही खरेदी दोन दिवसांत नाफेडद्वारा न झाल्यास स्वाभिमानी संघटना आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक ओमप्रकाश गायकवाड़, जिल्हा सचिव राजुभाऊ गायकवाड़, शहराध्यक्ष अजय इंगोले आदींची उपस्थिती होती.