शिरपूर येथे तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 18:29 IST2018-06-02T18:29:17+5:302018-06-02T18:29:17+5:30

. शिरपूर येथे शनिवारी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले. 

Laptop distrubuted to talathis at shirpur | शिरपूर येथे तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण

शिरपूर येथे तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण

ठळक मुद्दे जिल्ह्यांमधून तलाठ्यांसाठी 'लॅपटॉप' आणि 'प्रिंटर'ची मागणी करण्यात आली होती. शिल्लक असलेले लॅपटॉप आता प्राप्त झाले असून, त्यांचे वितरण तलाठ्यांना करण्यात येत आहे. शिरपूर येथे शनिवारी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले. 

वाशिम: जिल्ह्यांमधून तलाठ्यांसाठी 'लॅपटॉप' आणि 'प्रिंटर'ची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी डिसेंबर महिन्यात काही 'लॅपटॉप' व 'प्रिंटर' प्राप्त झाले, तर उर्वरित मागणीनुसार शिल्लक असलेले लॅपटॉप आता प्राप्त झाले असून, त्यांचे वितरण तलाठ्यांना करण्यात येत आहे. शिरपूर येथे शनिवारी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले. 
शासनाच्या बदलत्या धोरणानुसार आजमितीस महसूल विभागातील बहुतांश कामे 'आॅनलाईन' झाली आहेत. त्यामुळे या विभागातील महत्वाचा घटक म्हणून ओळख असलेल्या तलाठ्यांना 'लॅपटॉप' आणि 'प्रिंटर' आवश्यक ठरत आहेत. मात्र, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यात येणार असल्याने त्याची राज्यपातळीवर एकत्रितच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी लागणाºया ठराविक रक्कमेची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करित जिल्हा प्रशासनाने शासनाकडे वर्ग केली होती. दरम्यान, राज्याच्या माहिती व तंत्र विभागाकडून डिसेंबरअखेर वाशिम जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत कमी लॅपटॉप आणि प्रिंटर पाठविण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित लॅपटॉप आणि प्रिंटरसाठी जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा सुरू होता. आता ते लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध झाले असून ते तालुकानिहाय कार्यरत तलाठ्यांना वितरित करण्यात येत आहेत.

Web Title: Laptop distrubuted to talathis at shirpur