शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांवर चालणार ‘कुऱ्हाड’!

By admin | Updated: April 14, 2017 20:42 IST

वाशिम- नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणी व आखणीमुळे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध संघटना सरसावल्या आहेत.

रस्ता रुंदीकरण व सौदर्यीकरण : वृक्ष कायम ठेवण्यासाठी संघटनांचा पुढाकारनंदकिशोर नारे - वाशिमशहर सौदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. १३ एप्रिल रोजी नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणी व आखणीमुळे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध संघटना सरसावल्या आहेत. शहराचे सौंदर्यीकरण व भरभरून विकास ही बाब प्रत्येकाच्या मनाला पटणारी आहे. मात्र, अनेक वर्षांपासून उभी असलेली झाले कापून तो शहराचा विकास होत असेल, तर तो न झालेला बरा असा पवित्रा ‘ऋणानुबंध’ बहुउदेशिय संस्थेद्वारा संचालित ‘वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटना’ व ‘मानद वन्यजिव रक्षक समिती’ने घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. गत दोन वर्षांपूर्वी आंबेडकर चौक ते नगरपरिषद चौक दरम्यान करण्यात आलेल्या रस्तारूंदीकरणादरम्यान ४0 ते ५0 वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर या मार्गाच्या कडेला वृक्षारोपण होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. हे उदाहरण समोर असताना, आता आंबेडकर चौक ते सिव्हिल लाईन मार्गावरील वृक्षांवर ‘कुऱ्हाड’ चालविली जाणार आहे. एकीकडे शासनद्वारे कोटयवधी झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जातो, तर दुसरीकडे शहर विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्ष तोड केली जात आहे. अनेक वर्षांपासून वाशिमकरांना छाया देणाऱ्या वृक्षांचा शहर विकासादरम्यान बळी जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून, ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटनेचे सचिव प्रविण जोशी व मानद वन्यजिव रक्षकचे प्रशांत जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाशिम नगरपरिषद नगरअभियंता विजय घुगरे (श्रेणी क) यांच्याशी संपर्क साधला असता, रस्ता रूंदीकरणादरम्यान या मार्गावरील केवळ वाहतुकीला अथडळा निर्माण करणारी झाडेच काढली जाणार असून, अन्य झाडे कायम ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मार्गाच्या दुतर्फा अनेक झाडे जिर्ण झाली असून, ती केव्हाही कोसळून अपघात घडण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील किमान २५ झाडे कमी करण्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. रस्ता रुंदीकरण, सौदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक वर्षांपासून असलेले झाडे तुटणार असल्याने ते पुन्हा उभे करण्यास खूप कालावधी लागणार आहे. ते तुटू नये याकरिता आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे.- प्रविण जोशी, सचिव, वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटना, वाशिमवृक्षतोडीमुळे पशुपक्ष्यांचे घर उध्दवस्त होणार आहेत. शहरातील झाडे तुटू नये यासाठी संबधितांनी प्रयत्न करुन रस्ता रुंदीकरण, सौदर्यीकरण करावे. शासन एकीकडे कोटयवधी रुपये खर्च करुन वृक्षारोपण कार्यक्रम राबवित असतांना दुसरीकडे वृक्ष तोड करणे योग्य नाही. यावर फेरविचार होणे गरजेचे आहे.- प्रशांत जोशी, मानद वन्यजिव रक्षक, वाशिम.रस्त्याच्या मधोमध किंवा वाहतुकीच्या जागेत येणारी झाडेच काढावे लागणार आहेत. जवळपास असे २५ झाडांचा समावेश आहे. रस्ता रुंदीकरणासोबतच नवीन वृक्ष लागवड सुध्दा केल्या जाणार आहे. कोणतेही झाड नाहक कापलय जाणार नाही. - विजय घुगरे, नगर अभियंता (श्रेणी ‘क’), वाशिम नगरपरिषद, वाशिम