मानाेरा तालुक्यात होणार ५४१७२ हेक्टरवर खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:03+5:302021-06-22T04:27:03+5:30

मानाेरा : तालुक्यातील शेतकरी यावर्षी ५४१७२ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी करणार आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या विविध प्रकारच्या ...

Kharif sowing will be done on 54172 hectares in Manaera taluka | मानाेरा तालुक्यात होणार ५४१७२ हेक्टरवर खरिपाची पेरणी

मानाेरा तालुक्यात होणार ५४१७२ हेक्टरवर खरिपाची पेरणी

Next

मानाेरा : तालुक्यातील शेतकरी यावर्षी ५४१७२ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी करणार आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या विविध प्रकारच्या पिकांच्या पेरणीसाठी मागील काही महिन्यांपासून बी-बियाणे, खते, औषधांच्या खरेदीचे नियोजन केलेले होते. यासाठी राष्ट्रीयीकृत तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतरही बँकांद्वारे शासनाकडून पतपुरवठा शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, भाजीपाला आणि इतरही फळपिके व फुलशेतीच्या प्रमाणित बियाण्यांची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडून हे बियाणे व इतर पेरणीसाठीची कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी मागील पंधरवड्यापासून मानोरा शहर आणि तालुक्यातील इतर मोठ्या बाजारपेठांमध्ये गर्दी केलेली दिसून आली. तालुक्यातील मानोरा, गिरोली, शेंदुर्जना या महसूल मंडळांत ९ जूनपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्यामुळे जिल्हा व तालुका कृषी प्रशासनाने ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचा सल्ला तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध माध्यमांद्वारे दिलेला होता. प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र भारत सरकार नागपूर यांच्याकडून १० ते १३ तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अति पावसाचा इशारा दिलेला असल्याने आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा सल्ला बहुतांश शेतकऱ्यांनी तालुक्यात अमलात आणलेला दिसून आला. तालुक्यातील शेंदुर्जना व इतरही काही महसूल मंडळे डोंगराळ भागात मोडत असल्याने व नांदुरा तालुक्यामध्ये सिंचनाच्या सुविधा पुरेशा नसल्याने तालुक्यातील शेतकरी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कपाशी ही नगदी पिके घेण्यावर भर देतो. तालुक्‍यातील शेतकऱ्यांची शेती ही अधिकतर कोरडवाहू असल्याने आणि सोयाबीनसारखी पिके कमी पावसात येणारी असल्याने मागील दोन तपापासून सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल उत्तरोत्तर वाढतो आहे. तालुक्यात फळपिके भाजीपाला फुलशेतीचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नियोजनानुसार यावर्षी पीकनिहाय क्षेत्र निर्धारित करण्यात आलेले आहे.

..........

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला साथ देत सोयाबीनचे घरचे बियाण्याची मोठ्या प्रमाणात वापर केला त्यामुळे जिल्हाभरासाठी सोयाबीनची मागणी केली होती. त्यानुसार महाबीज बियाणे उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची वाढती किंमत पाहता. नियोजित कपाशीचे क्षेत्र पूर्ण न होता सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.

डी. एस. मकासरे, कृषी अधिकारी पं.स., मानोरा

Web Title: Kharif sowing will be done on 54172 hectares in Manaera taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.