रस्ता अपघातात मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 15:50 IST2020-05-12T15:48:43+5:302020-05-12T15:50:09+5:30
काशिराम उबाळे जागीच ठार झाल्याची घटना चांडस-पांगरखेडा मार्गादरम्यान शिरपूरनजीक १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजतादरम्यान घडली.

रस्ता अपघातात मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे यांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : दुचाकीच्या अपघातात जिल्ह्यातील नंधाना येथील रहिवासी तथा मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे जागीच ठार झाल्याची घटना चांडस-पांगरखेडा मार्गादरम्यान शिरपूरनजीक १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजतादरम्यान घडली.
काशिराम उबाळे हे काही कामानिमित्त चांडस-पांगरखेडा मार्गाने एमएच ३७ एक्स ११७८ क्रमांकाच्या दुचाकीने १२ मे रोजी शिरपूर येथे येत होते. दरम्यान, शिरपूरनजीक त्यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला, मेंदूला आणि डोळ्याला जबर मार लागला. यामध्ये त्यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनच्यावतीने वाहन चालक रमेश मोरे हे घटनास्थळावर पोहोचले. अपघात नेमका कसा घडला, दुचाकी स्लीप झाली की मागून एखाद्या वाहनाने धडक दिली, याबाबत निश्चित माहिती नाही.