वाशिम जिल्ह्यात १.३९ लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 13:35 IST2019-08-02T13:35:38+5:302019-08-02T13:35:44+5:30
वाशिम : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील जवळपास २ लाख १० हजार ८६७ शेतकऱ्यांनी १ लाख ३९ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावरील विविध स्वरूपातील पिकांचा विमा उतरविला आहे़.

वाशिम जिल्ह्यात १.३९ लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील जवळपास २ लाख १० हजार ८६७ शेतकऱ्यांनी १ लाख ३९ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावरील विविध स्वरूपातील पिकांचा विमा उतरविला आहे़. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा योजनेत सहभागी होण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने २९ जुलै रोजी मुदतवाढ देवून ३१ जुलै ही अंतीम मुदत केली होती. त्यामुळे बहुतांश शेतकरी या योजनेत सहभागी होवू शकले.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील २ लाख १० हजार ८६७ शेतकºयांनी आतापर्यंत खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमा हप्त्यापोटी ११ कोटी ९५ लाख ९६ हजार ८७२ रूपये भरले आहेत़ गतवर्षी जवळपास २ लाख शेतकºयांनी पीकविमा भरला होता़
दरम्यान, यंदा विलंबाने का होईना दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिक परिस्थिती सुधारल्याचे दिसून येत आहे.