तालुकास्तरीय पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:18+5:302021-06-05T04:29:18+5:30
यापूर्वी तालुका कृषी अधिकारी किशोर सोनटक्के व पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिगांबर मकासरे यांनी धानोरा घाडगे येथे धाड टाकून ...

तालुकास्तरीय पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी
यापूर्वी तालुका कृषी अधिकारी किशोर सोनटक्के व पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिगांबर मकासरे यांनी धानोरा घाडगे येथे धाड टाकून जवळपास ५ लाख ९० हजार रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर इतरही कृषी सेवा केंद्रांमध्ये बोगस बियाणे विक्रीचा प्रकार सुरू आहे किंवा कसे, याची तपासणी भरारी पथकामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व योग्य दराने बी-बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी कृषी सेवा केंद्रांच्या संचालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. भरारी पथकाने तपासणीदरम्यान कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेऊन जादा दराने कृषी निविष्ठा विक्री करू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी तालुक्यातील काही शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.