शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या गैरप्रकाराची चौकशी

By admin | Updated: January 2, 2015 01:05 IST

वाशिम जिल्हयातील ४१७ प्रकरणांची चौकशी ; ५ कोटी ३९ लाख ६९ हजार रूपयाची अफरातफर झाल्याचा संशय.

वाशिम : जिल्हयातील विविध ग्रामपंचायतीमधील अनियमितता चव्हाटयावर आली असून अफरातफरीचा आकडा जवळपास साडेपाच कोटी रूपयापर्यंंंत पोहचला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अंतर्गंत पंचायत स्तरावर विशेष पथकाने चौकशीला सुरूवात केली आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतीमधील ४१७ प्रकरणांमध्ये छोटे- मोठे भ्रष्टाचार, लेखापरिक्षणातील आक्षेपासह ५ कोटी ३९ लाख ६९ हजार १८७ रूपयांच्या अफरातफर झाल्याची शंका आहे. संशयीत रकमेची प्रशासकीय चौकशीस प्रारंभ झाला असून यामध्ये १ लाख रूपयांच्यावर अफरातफर असलेल्या १२३ प्रकरणांचा समावेश आहे. तर इतर २९४ असे एकूण ४१७ प्रकरणांचा समावेश आहे. सदर प्रकरणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत यांच्याकडे प्रकरणाचा अंतिम अहवाल गेल्यानंतरच दोषीवर कारवाई केल्या जाणार आहे. एक लाखावरील १२३ प्रकरणे वगळता २९४ प्रकरणामध्ये ६८ लाख ९२ हजार १0९ रूपये गैरप्रकाराचा संशय असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. १२३ प्रकरणांमध्ये तालुकानिहाय वाशिममध्ये १३ प्रकरणे, रिसोड १५, मालेगाव १८, मंगरूळपीर १८, मानोरा २२ तर मानोरा तालुक्यात ३७ प्रकरणांच समावेश आहे. या प्रकरणांमधील गैरप्रकाराची संशयीत रक्कम ४ कोटी ७0 लाख ७७ हजार ७८ रूपये एवढी आहे. यामध्ये तालुकानिहाय वाशिम तालुका ४३ लाख ५२ हजार ८७२, रिसोड ६४ हजार १९ हजार ८७, मालेगाव तालुक्यात ६६ लाख १९ हजार १५४, मंगरूळपीर तालुक्यात ७४ लाख १९ हजार ४७१, मानोरा तालुक्यात १ क ोटी १२ लाख ५६ हजार ९२ तर कारंजा तालुक्यात १ कोटी १0 लाख २६ हजार ६७१ हजार रूपयांचा अफरातफरीचा समावेश आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला असून दोषि आढळणार्‍या ग्रामपंचायतीवर कारवाई केल्या जाणार आहे. मंगरूळपीर तालुक्यातील १५ ग्रामपंचायत मध्ये मागील काळात अफरातफर झाल्याचे १८ प्रकरणो जि.प.प्रशासनाकडे प्रलंबीत होते.परंतु आज पावतो सदर अफरातफर प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.परंतु मुख्यकार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत यांच्या आदेशानुसार पंचायत समिती स्तरावरून अफरातफर प्रकरणात अडकलेल्या १५ ग्रामपंचायत मधील १८ प्रकरणाची चौकशी गतीने सुरू असुन काही ग्राम पंचायतीची चौकशी पुर्ण झाली असुन त्यांच्याकडुन अफरातफरीची रक्कम वसुल करण्या संदर्भात कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.