वन्य प्राण्यांवर नियंत्रणासाठी शेतकर्यांचा अभिनव प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:28 IST2017-09-04T01:27:52+5:302017-09-04T01:28:37+5:30
वाशिम : शेतीमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करणार्या वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्यांनी अभिनव प्रयोग केला आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते आणि स्टिलचे ताट वापरून त्यांनी हवेवर चालणारे आणि मोठा आवाज करणारे यंत्रच तयार केले. यामुळे वन्य प्राणी शेताच्या आसपासही फिरकत नसल्याने त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे.

वन्य प्राण्यांवर नियंत्रणासाठी शेतकर्यांचा अभिनव प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतीमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करणार्या वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्यांनी अभिनव प्रयोग केला आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते आणि स्टिलचे ताट वापरून त्यांनी हवेवर चालणारे आणि मोठा आवाज करणारे यंत्रच तयार केले. यामुळे वन्य प्राणी शेताच्या आसपासही फिरकत नसल्याने त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे.
रोही, रानडुक्कर, हरीण, माकडे आदी वन्य प्राणी शेतशिवारात धुमाकूळ घालून पिकांचा फडशा पाडतात. त्यामुळे शेतकर्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या वन्य प्राण्यांना मारताही येत नाही. त्यातच रानडुकरांसारखे प्राणी, तर शेतकर्यांवरच हल्ले करतात. त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न अनेक शेतकर्यांना सतावत आहे. यावर एक नामी उपाय मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्यांनी शोधला आहे. शेतकर्यांनी त्यासाठी एक आवाज काढणारे आणि हवेच्या आधारे फिरणारे यंत्रच तयार केले आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते सायकलमधील रिंगच्या बेअरिंगला फिट करून त्या बेअरिंगच्या दुसर्या बाजूने एक लोखंडी पट्टी फिट केली. त्या पट्टीच्या दोन्ही टोकांवर साखळीचे सहज वेडेवाकडे होणारे तुकडे लावले, हे वार्याने फिरणारे यंत्र एका लाकडी खांबावर बसवून. त्याच खांबावर पंख्याच्या मागील बाजूस लोखंडी पट्टीवर बसविले व साखळीचे तुकडे सहज आदळतील अशा अंदाजाने स्टिलच्या धातूचे ताटही बसविले. वारा जोरात वाहू लागला की कुलरचे पाते फिरायला लागते आणि त्यासोबत मागील बाजूस बसविलेली लोखंडी पट्टी फिरून त्या पट्टीच्या दोन्ही टोकावर लावलेल्या साखळय़ा ताटावर आदळत राहतात. त्यामुळे सतत आवाज होत राहतो. हा आवाज होत असल्याने शेतात कोणी असल्याचा भास प्राणी आणि पक्ष्यांना होतो. परिणामी ते शेताच्या आसपासही फिरकत नाहीत. मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा येथील शेतकरी शशिकांत गहुले आणि मानोली येथील शेतकरी मनोहर महाकाळ यांच्यासह शिवारातील अनेक शेतकर्यांनी या यंत्राचा वापर सुरू केला आहे.