जखमी मोराचे वन्यजीवरक्षकांनी वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:19 IST2018-08-05T16:17:37+5:302018-08-05T16:19:13+5:30
वन्यजीवरक्षकांनी या मोराला पशूवैद्यकीय दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार सुरू करीत जीवदान दिले.

जखमी मोराचे वन्यजीवरक्षकांनी वाचविले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मानोरा तालुक्यातील कोलार येथे ५ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत आढळून आला. वन्यजीवरक्षकांनी या मोराला पशूवैद्यकीय दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार सुरू करीत जीवदान दिले. या मोरावर दोन दिवस उपचार करण्यात येणार असल्याचे पशूवैद्यकीय अधिकार डॉ. विशाल शिरसाट यांनी सांगितले. मानोरा तालुक्यातील कोलार येथे ५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ईश्वर भूतडा यांच्या शेतात राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत पडून असल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत वाईल्ड लाईफ कंन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या कोलार येथील शाखेला ही माहिती दिली. त्यावरून टीमचे सदस्य श्रीकांत डापसे, गौरव पूसदकर, शुभम सावळे, आशिष ठाकरे यांनी त्वरित भुतडा यांच्या शेतात जाऊन मोराची पाहणी करीत मानोरा वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनरक्षक व्ही. बी चतूरकर यांनी वन्यजीवरक्षकांच्या मदतीने त्या मोराला पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. शिरसाट यांच्याकडे आणले. तेथे मोरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. हा मोर पूर्णपणे बरा होण्यासाठी दोन दिवस उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल शिरसाट यांनी सांगितले.