पपईवर चंदेरी करपा रोगाची लागण; रोपे सुकण्याची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:19 IST2019-02-04T16:19:23+5:302019-02-04T16:19:43+5:30
वाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून पपईची लागवड सुरू झाली असून, वितभर वाढलेल्या पपईच्या रोपांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे.

पपईवर चंदेरी करपा रोगाची लागण; रोपे सुकण्याची भिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून पपईची लागवड सुरू झाली असून, वितभर वाढलेल्या पपईच्या रोपांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. यात चंदेरी करपा रोगाचा समावेश असल्याने रोपे सुकण्याची भिती निर्माण झाली असून, या रोगामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजनांचा आधार घेण्यासह खाजगी खर्च करून शेतकरी फळझाडांची लागवड करीत असल्याने जिल्ह्यात फळबागांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. यात पपईचाही समावेश आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यापासून नव्याने शेतकºयांनी पपईची लागवड सुरू केली आहे. विविध जातीच्या रोपांचा वापर करून शेतकरी पपईचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना वातावरणातील बदलाने खोडा घातला असून, पपईच्या रोपांवर विविध रोगांचे आक्रमण होत आहे. त्यात काही ठिकाणी चंदेरी करपा या रोगाचा प्रादूर्भाव दिसत असून, या रोगामुळे रोपे सुकण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. वातावरणातील बदलामुळे होणाºया या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करीत असून, या रोगावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी साफ आणि रिडोलमील या औषधींची फवारणी करण्याचा सल्ला शेतकºयांना देण्यात येत आहेत. तथापि, या रोगापासून पपईचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय योजना शेतकºयांना माहिती असाव्यात यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.