लग्नाच्या शूटिंगसाठी विनापरवानगी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 12:20 IST2021-07-25T12:16:52+5:302021-07-25T12:20:12+5:30
Washim News : आता छोट्या शहरांमध्येही ड्राेनव्दारे फाेटाे, शूटिंगची ‘क्रेझ’ वाढत आहे.

लग्नाच्या शूटिंगसाठी विनापरवानगी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम लग्न समारंभाची शूटिंग ड्राेनव्दारे करायची असेल तर ड्राेनचे लायसन्स व उडविण्याची स्थानिक पाेलिसांकडून परवानगी आवश्यक आहे. अन्यथा आपल्यावर कारवाई हाेऊ शकते, अशी माहिती पाेलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
महानगरांनंतर आता छोट्या शहरांमध्येही ड्राेनव्दारे फाेटाे, शूटिंगची ‘क्रेझ’ वाढत आहे. यापूर्वी केवळ उच्चभ्रू लोकांकडूनच पसंती दिली जात होती. आता अनेक ठिकाणी याचा वापर केला जाताेय. वाशिम शहरामध्येही तीन व्यावसायिकांकडे ड्राेन उपलब्ध आहेत. पूर्वी नजीकच्या अकाेला, अमरावती जिल्ह्यातून आणून लग्नात यापूर्वी ड्राेनव्दारे शूटिंग करण्यात येत हाेती. परंतु ग्राहकच नसल्याने ड्राेन अडगळीत पडले आहेत
ड्रोन उडवण्यासाठी नियम आणि कायदे
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमानुसार ड्रोन विक्री आणि उडवण्याबाबत नियम आणि कायदे निश्चित केले आहे.
वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी मिळते.
काेणत्याही कार्यात ड्राेन उडवायचे असल्यास स्थानिक पाेलीस प्रशासनास सांगणे गरजेचे.
व्यावसायिक किंवा करमणुकीच्या उद्देशाने २५० ग्रॅम ते २५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोन उड्डाणासाठी परवाना आवश्यक असणे आवश्यक आहे.
मर्यादित उंची आणि क्षेत्रामध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी दिली जाते; मात्र ड्रोनद्वारे कोणतीही धोकादायक वस्तू वाहून नेण्यास मनाई आहे.
पोलिस परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही. त्यासाठी रीतसर स्थानिक पोलिसांना अर्ज करावा लागतो.
संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, कोणत्या कारणासाठी ड्रोन उडवणार आहे, किती कालावधीसाठी याची माहिती घेतल्या जाते.
नॅनो श्रेणीतील ड्रोन वगळता वैध परवाना किंवा परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्यास दंड हाेऊ शकताे. नाे फ्लाईंग झाेन असल्यास ड्राेन उडविता येत नाही.
कोणताही लहान ड्रोन १२० मीटर उंचीपेक्षा अधिक आणि कमाल २५ मीटर प्रतिसेकंद वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करण्यास मनाई.