शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

झोपडीत पोहोचला फराळ, धान्य,पणत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:43 AM

सामाजीक जाणीवेतून गत दहा वषार्पासून  दिवाळीनिमित्त झोपडपट्टी व रस्त्यावरील गरजवंतांच्या घरी  जावून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणारे तरुण  क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व आयुर्वेद तज्ञ डॉ. दी पक ढोके यांच्या वतीने मंगळवार, १७ ऑक्टोंबर रोजी गरजवं तांच्या झोपडीत जावून दिवाळीचा फराळ, धान्य, लाडू व पणत्या  देवून त्यांचा आनंद व्दिगूणीत केला. 

ठळक मुद्देदहा वर्षांची परंपरा समाजसेवी नीलेश सोमाणी व डॉ. दीपक ढोकेंचा पुढाकार 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  सामाजीक जाणीवेतून गत दहा वषार्पासून  दिवाळीनिमित्त झोपडपट्टी व रस्त्यावरील गरजवंतांच्या घरी  जावून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणारे तरुण  क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व आयुर्वेद तज्ञ डॉ. दी पक ढोके यांच्या वतीने मंगळवार, १७ ऑक्टोंबर रोजी गरजवं तांच्या झोपडीत जावून दिवाळीचा फराळ, धान्य, लाडू व पणत्या  देवून त्यांचा आनंद व्दिगूणीत केला.   स्थानिक जुन्या जि.प. समोरील झोपडपट्टी मध्ये वास्तव्य  करणारे गरजवंत, जिल्हा सामान्य रुग्णालय, बसस्थानक  परिसर, पुसद नाका परिसर व रेल्वे स्टेशन परिसरा जवळील  जवळपास शंभर परिवारांना फराळ, धान्य, पणत्या व लाडुचे  वितरण सोमाणी व डॉ. ढोके यांच्या हस्ते करण्यात आले.  आकस्मिकपणे धनतेरसच्या दिवशी मिळालेल्या मदतीने  अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. अनेक गरजवंत  वयोवृध्दांनी या उपक्रमाचे स्वागत करुन सोमाणी व ढोके यांच्या  डोक्यावर हात ठेवून त्यांना आशिर्वाद दिले. गत दहा वषार्पासून  सतत हा उपक्रम सुरु आहे. सोबतच दरवर्षी कडाक्याच्या थंडीत  गरजवंतांना रात्रीच्या वेळी जावून त्यांना ब्लँकेटचे वाटपही  सोमाणी व ढोके करत आहेत. इतकेच नव्हे तर पशुपक्षांसाठी  दरवर्षी पाणपोई हा उपक्रम ते राबवित असतात. विविध  सामाजीक उपक्रमाच्या सोबतच वेगवेगळ्या ठिकाणी गरजवं तांना सदैव मदतीचा हात देण्याचे काम ही जोडी करत आहे.  सदर उपक्रमाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.  निराधारांना आधार देवून खरा आनंद देण्यात आहे. दिवाळी  निमित्त परिवाराकरीता आपण हजारो रुपयाची उधळण करतो.  हजारो रुपयाचे फटाके फोडण्यात येतात. मात्र दुसरीकडे झोपड पट्टी व रस्त्यावरील गरजवंतांच्या जीवनात कधी प्रकाशाचे दीप  जळत नाहीत. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात जो आनंद  आहे तो कशातही मिळत नाही. झोपडीत दिवाळीनिमित्त पणती  जाळण्याचे पुण्यकार्य घडत आहे. सोबतच त्यांना जीवनावश्यक  धान्य, फराळ व मिठाईरुपी आनंद उपलब्ध करुन मानसिक  समाधान मिळत असल्याचे सोमाणी व ढोके यांनी स्पष्ट केले  असून समाजातील दानशुर, सामाजीक संस्था, समाजसेवकांनी  गरजवंतांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हीच खरी  दिवाळी व समाजसेवा आहे असे आवाहन त्यांनी केले. तरुण  क्रांती मंच, आयुष जीवन विकास संस्था व स्वामी विवेकानंद  शिक्षण व व्यायाम प्रसारक मंडळ धनज बु. या संस्थांनी या  कायार्साठी पुढाकार घेतला.

सोमाणी व ढोके यांचे कार्य प्रेरणादायी - जिल्हाधिकारीनिराधारांना आधार देणार्र्‍या उपक्रमाची आज खरी गरज आहे.  एकीकडे प्रकाशाचा झगमगाट तर दुसरीकडे काळोख आहे.  दुसर्?यांच्या दु:खात सहभागी होवून त्यांच्या जीवनात आनंद  निर्माण व्हावा, त्यांनी ही दिवाळी साजरी करावी. झोपडीतही पण त्या जळाव्या, सोबतच फराळ व धान्य वितरण करण्याचे कार्य  समाजसेवी निलेश सोमाणी व डॉ. दीपक ढोके निरंतर करत  असून त्यांच्या या उपक्रमाचे आपण स्वागत करुन त्यांचे कार्य  प्रेरणादायी असल्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगी तले.

टॅग्स :diwaliदिवाळी