पत्नीची हत्या करणाऱ्यां पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 16:50 IST2020-09-22T16:50:11+5:302020-09-22T16:50:18+5:30
१९ सप्टेंबरला पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पतीने गळफास घेऊन २२ सप्टेंबरला आत्महत्या केल्याचे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथे उघडकीस आले.

पत्नीची हत्या करणाऱ्यां पतीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : घरगुती वादातून धारदार शस्त्राने १९ सप्टेंबरला पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पतीने गळफास घेऊन २२ सप्टेंबरला आत्महत्या केल्याचे मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथे उघडकीस आले.
कोळगाव येथील सागरबाई मुळे आणि किसन मुळे यांच्यात गेल्या एका वर्षापासून शेती व घरगुती कारणावरून वाद सुरू होते. त्यामुळे सागरबाई व आरोपी किसन मुळे हे वेगवेगळे राहत होते. १९ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान सागरबाई ही म्हैस चारण्यासाठी शेतात घेऊन गेली असता, तिच्या मागे आरोपीही धारदार कुºहाड घेऊन शेतात गेला. शेतशिवारात धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पती हा तेव्हापासून फरार होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन फरार आरोपीचा शोध सुरु केला. मात्र, २२ सप्टेंबर रोजी त्याच शेतशिवारातील लाकडी मळ्यावर जाण्यासाठी तयार केलेल्या लाकडी शिडीला किसन मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले. घटनास्थळाला मालेगावचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी पोलिस ताफ्यासह भेट देवून पंचनामा केला. पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.