शेकडो शेतक-यांची घेतली समृद्धी मार्गासाठी जमीन न देण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 19:46 IST2017-07-30T19:44:33+5:302017-07-30T19:46:09+5:30

शेकडो शेतक-यांची घेतली समृद्धी मार्गासाठी जमीन न देण्याची शपथ
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासाठी जमीन न देण्याची शपथ मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेकडो प्रकल्पबाधितांनी शनिवारी घेतली.
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाविरोधातील संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाºयांचा या मार्गाबाबत शेतकºयांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू आहे. याच अंतर्गत या समितीने शनिवारी मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे शेकडो शेतकºयांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते. या सभेला जिल्हा परिषद वाशिमचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे, नाशिकचे राजू देसले, शहापूरचे बबनराव हरणे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. या सभेत शेकडो शेतकºयांनी समृद्धी महामार्गासाठी जमीन न देण्याची शपथ घेतली. या सभेला संबोधित करताना बबनराव हरणे म्हणाले, की या मार्गाबाबत शासन अद्यापही शेतकºयांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आमचा विकासाला विरोध नाही; परंतु शासनाची भूसंपादन पद्धत चुकीची आहे. ती आम्हाला मान्य नाही. वाटाघाटीने रेडीरेकनरच्या पाच पट रकमेऐवजी २०१३ च्या कायद्यानुसार बाजारमुल्याच्या पाच पट मोबदला द्यावा, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.