शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषीपंपाच्या लाभापासून शेकडो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:58 IST

शासनस्तरावरून योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असून १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन स्वरूपात कोटेशन देणे व अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया देखील बंद पडली आहे.

लोेकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शेतीला अखंडित मिळावी, वीज देयकांचा वाढलेला खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या मागेल त्या शेतकऱ्यास सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी इच्छुक आहेत; परंतु शासनस्तरावरून योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असून १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन स्वरूपात कोटेशन देणे व अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया देखील बंद पडली आहे. दरम्यान, १८ मेपर्यंत केवळ जैन इरिगेशन या कंपनीकडून उण्यापूºया १५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषीपंप स्थापित झाले असून इतर इच्छुक शेकडो शेतकरी या योजनेपासून अद्याप वंचित असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित ऊर्जेच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्रात सौर कृषीपंप योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. अपारंपारिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेवून राज्यशासनाने शेतकºयांना सौर कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली. याअंतर्गत कृषी पंप सौरऊर्जेशी जोडले जाणार आहेत.विशेष बाब म्हणजे या योजनेंतर्गत मागेल त्या शेतकºयास सौर कृषीपंप दिले जाणार असून कुठलेही ठराविक उद्दीष्ट त्यासाठी ठेवण्यात आलेले नाही. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील अनेक सुज्ञ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी निर्धारित करण्यात आलेल्या वेबसाईटवर आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. ते निकाली काढून संबंधित शेतकºयांच्या शेतांमध्ये सौर कृषीपंप स्थापित करण्यासाठी महावितरण तद्वतच संबंधित कंपन्यांनी पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या महत्वपूर्ण बाबीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. अशातच १ मार्च २०१९ पासून आॅनलाईन कोटेशन मिळविणे आणि अर्ज सादर करण्यासाठी निर्धारित केलेली वेबसाईट देखील बंद असल्याने शेकडो शेतकºयांना अर्ज करता आलेले नाहीत. यामुळे महत्वाकांक्षी समजल्या जात असलेल्या सौर कृषीपंप योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, तीन अश्वशक्ती क्षमता असलेल्या सौर एसी पंपाची आधारभूत किंमत ३ लाख २४ हजार असून त्यासाठी ३० टक्के केंद्राचे अनुदान (९७ हजार २०० रुपये), राज्य शासनाचे पाच टक्के अनुदान (१६ हजार २०० रुपये); तर लाभार्थ्यांचा हिस्सा १६ हजार २०० तसेच याअंतर्गत घ्यावयाचे कर्ज १ लाख ९४ हजार ४०० रुपये असणार आहे. तीन अश्वशक्ती डीसी पंपासाठी आधारभूत किंमत ४ लाख ५ हजार. त्यात केंद्रशासनाचे १ लाख २१ हजार ५००, राज्याचे आणि लाभार्थ्याचे प्रत्येकी २० हजार २५०, कर्जाचा हिस्सा २ लाख ४३ हजार रुपये, पाच अश्वशक्ती ए.सी. पंपासाठी आधारभूत किंमत ५ लाख ४० हजार. त्यात केंद्राचे १ लाख ६२ हजार, राज्याचे आणि लाभार्थ्याचे प्रत्येकी २७ हजार; तर कर्जाचा वाटा ३ लाख २४ हजार रुपये असणार आहे. मात्र, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी