शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्त अभियान झाले ‘हायटेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:47 IST

वाशिम : राज्यभरात सुरू असलेले हगणदरीमुक्त अभियान आता हायटेक झाले आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत स्तरावर गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे‘स्वच्छ महाराष्ट्र’ नावाने सुरू झाला व्हॉट्स अँप ग्रुप दररोज द्यावा लागणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरात सुरू असलेले हगणदरीमुक्त अभियान आता हायटेक झाले आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत स्तरावर गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके सक्रिय करण्यात आली आहेत. आता या पथकांमध्ये आयुक्त, उपायुक्त, मुख्याधिकार्‍यांसह महापौर, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही समावेश असून, या पथकाने केलेल्या पाहणीचा अहवाल सादर करण्यासाठी ‘स्वच्छ महाराष्ट्र’ नावाने प्रशासकीय व्हॉट्स अँप ग्रुप तयार करण्यात आला आहे.  राज्यातील शहरे हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रत्येक शहराने उघड्यावरील हगणदरीची ठिकाणे निष्कासित करण्यासाठी ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथके कार्यरत करण्याबाबतच्या सूचना शासनाकडून पूर्वीच देण्यात आल्या आहेत. या ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकांना अधिक सक्रिय होऊन दररोज पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करावे लागणार आहे. नगर परिषद, नगर पंचायत मुख्याधिकार्‍यांना त्यांच्या क्षेत्रातील ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकात स्वत: सहभागी होणे आवश्यक आहे. ‘क’ व ’ड’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकामध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्तांना स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे, तर, ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उपआयुक्त, सहायक आयुक्तांना पथकामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. या ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकात महापौर, नगराध्यक्ष व संबंधित वॉर्ड किंवा प्रभागाच्या नगरसेवकांनाही सहभागी करून घ्यावे लागणार आहे. या पथकाने उघड्यावरील हगणदरीच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर उघड्यावर शौचास करणारे व्यक्ती न आढळल्यास त्यानुसार अहवाल, तसेच उघड्यावर शौचास बसताना व्यक्ती आढल्यास आनुषंगिक करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्या उपाययोजनांचा अहवाल आयुक्त, नगर परिषद, नगर पंचायतींच्या मुख्याधिकार्‍यांना दररोज सकाळी ११ वाजता स्वच्छ महाराष्ट्र या नावाने सुरू केलेल्या व्हॉट्स अँप ग्रुपवर टाकावा लागणार आहे. त्याशिवाय शहरी भागातील सामुदायिक शौचालयांची अवस्था आणि देखभालीसह इतर बाबींचा अहवालही या ग्रुपवर टाकावा लागणार आहे. 

 स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत हगणदरीमुक्तीत सातत्य राखण्यासाठी गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाची स्थापना करण्यात आली आहेच. आता या पथकांमध्ये मुख्याधिकार्‍यांसह इतर अधिकारी आणि नगर परिषद, नगर पंचायतींच्या पदाधिकार्‍यांचाही समावेश राहणार असून, या पथकाकडून हगणदरीमुक्त झालेल्या शहरात पाहणी करून त्याबाबतचा अहवाल प्रशासकीय व्हॉट्स अँप ग्रुपवर टाकण्यात येणार आहे.-दीपक मोरे,जिल्हा प्रशासन अधिकारी,नगरपालिका प्रशासन जि. वाशिम.