शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

नवजातांच्या श्रवण चाचणीअभावी कर्णबधिरत्व वैगुण्यात वाढ

By admin | Updated: September 28, 2015 02:16 IST

कर्णबधिरतेचा आजार फोफावत असून, यास शासन व पालकांची उदासीनता कारणीभूत.

वाशिम : अपत्याचा जन्म होताच चाचण्या न केल्याने कर्णबधिरतेचा आजार फोफावत असून, याला शासन व पालकांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप कर्णबधिरांच्या उत्थानासाठी झटणार्‍या स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. कर्णबधिरत्व हे अदृश्य व दुहेरी अपंगत्व आहे. देशात २.१ टक्के लोक या आजाराने ग्रासले आहेत. हा आजार चार प्रकारचा असतो. यामध्ये सौम्य, मध्यम, तीव्र व अतितीव्र कर्णबधिरत्व हे चार प्रकार आहेत. जन्मताच अपत्य कर्णबधिर आहे का, याची चाचणी झाली, तर त्वरित उपाय करता येतात व त्यामुळे बहुतांश मुलांमधून हा दोष नाहीसा होऊ शकतो; मात्र अशाप्रकारची तपासणी केली जात नाही. मूल दोन ते तीन वर्षांचे झाल्यावर पालकांना ते कर्णबधिर असल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचारही करण्यात येत नाहीत. याबाबत माहिती देताना अकोला येथील एकवीरा फाउंडेशनचे श्रीकांत बनसोड यांनी सांगितले, की जन्माला आलेले अपत्य कर्णबधिर असल्याचे तीन महिन्यांच्या आत समजले, तर त्यावर उपचार होऊ शकतात; मात्र मुलं मोठी झाल्यावर उपचार करणे कठीण होते. जिल्ह्यात उपचार केंद्र नाहीत वाशिम जिल्ह्यात कर्णबधिर मुलांवर उपचार करणारे केंद्रच नाहीत तसेच कर्णबधिरांना शिक्षण देणार्‍या शाळाही नाहीत. त्यामुळे अशा मुलांवर उपचार करण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथे पाठवावे लागते तसेच या मुलांना शिक्षण देण्यासाठीही मोठय़ा शहरांमध्येच पाठवावे लागते. अनसिंग येथे कर्णबधिरांची एक शाळा असून, तेथे केवळ आठवीपर्यंंत शिक्षण दिले जाते.