मुख्याध्यापकांनी बदललेली मूल्यमापन पद्धती आत्मसात करावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:27 IST2019-08-28T15:27:08+5:302019-08-28T15:27:29+5:30
वाशिम : मुख्याध्यापकांनी बदललेली मूल्यमापन पद्धती आत्मसात करावी, असे आवाहन अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले.

मुख्याध्यापकांनी बदललेली मूल्यमापन पद्धती आत्मसात करावी !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुख्याध्यापकांनी बदललेली मूल्यमापन पद्धती आत्मसात करावी, असे आवाहन अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले. स्थानिक हॅपी फेसेस स्कूल येथे आयोजित नियोजन सभेत ते बोलत होते.
दहावी, बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० या संदर्भात नियोजन व बदललेली मुल्यमापन पद्धती याबाबत पार पडलेल्या नियोजन सभेला विभागीय सहसचिव वामन बोलके, जयश्री घारफाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आकाश अहाळे यांच्यासह मुख्याध्यापक, प्राचार्यांची उपस्थिती होती.
दहावी, बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० या संदर्भात नियोजनावर चर्चा झाली. परीक्षा केंद्र, कॉपीमुक्त परीक्षा, योग्य नियोजन यासंदर्भात मुख्याध्यापक, प्राचार्यांशी संवाद साधला. इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीची मूल्यमापन पद्धत बदलली असून, बदललेली ही मुल्यमापन पद्धती मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आत्मसात करावी, असे आवाहन गोसावी यांनी केले. यावेळी स्कूल प्रोफाईल भरणे, बदललेली मुल्यमापन पद्धती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी तर आभार मुख्याध्यापक साहेबराव जाधव यांनी मानले.