मालेगावात ९.८४ लाखांचा गुटखा पकडला
By संतोष वानखडे | Updated: May 27, 2023 16:39 IST2023-05-27T16:39:11+5:302023-05-27T16:39:32+5:30
एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील गोदामात छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.

मालेगावात ९.८४ लाखांचा गुटखा पकडला
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहर हद्दीतील भेरा रोडवरील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील गोदामात छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.
नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले आहेत.
२६ मे रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकाने मालेगाव येथील भेरा रोडवरील मयूर इलेक्ट्रॉनिक्स समोरील बंडू उर्फ नंदलाल नारायण यादव, रा.जाट गल्ली, मालेगाव यांच्या मालकीच्या गोदामावर छापा टाकला असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपनीचा गुटखा/तंबाखूजन्य पदार्थ असलेला ९ लाख ८४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मालेगाव पोलिस स्टेशनला कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.