gurupurnima: गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त पोहरादेवीत हजारो भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:10 IST2018-07-27T14:06:30+5:302018-07-27T14:10:28+5:30

मानोरा  : बंजारा समाजाची काशाी पोहरादेवी येथे गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त  हजारो  भाविकांच्या उपस्थितीत उत्सवास प्रारंभ करण्यात आला.

gurupurnima: Thousands of devotees gatherd in pohradevi | gurupurnima: गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त पोहरादेवीत हजारो भाविक दाखल

gurupurnima: गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त पोहरादेवीत हजारो भाविक दाखल

ठळक मुद्दे विविध प्रदेशातील  भाविक येथे येवून डॉ. रामराव महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करतात. पायदळ सहा दिंडयासह आंध्रप्रदेशातून भाविक या उत्सवासाठी दाखल झाले आहेत. पायदळ दिंडीमध्ये ४० हजाराच्या जवळपास भाविक सहभागी आहेत.


मानोरा  : बंजारा समाजाची काशाी पोहरादेवी येथे गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त  हजारो  भाविकांच्या उपस्थितीत उत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्टÑसंत डॉ. रामराव महाराज यांचे  हजारो  भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
गुरु पौर्णिमाला दरवर्षी विविध प्रदेशातील  भाविक येथे येवून डॉ. रामराव महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करतात. याहीवर्षी परभणी जिल्हयातील गोत्रा, जालना जिल्हयातील गुळखंड, हिंगोली जिल्हयातील पाचंडा या गावातील पायदळ सहा दिंडयासह आंध्रप्रदेशातून भाविक या उत्सवासाठी दाखल झाले आहेत. येथे दाखल झालेल्या पायदळ दिंडीमध्ये ४० हजाराच्या जवळपास भाविक सहभागी असून संपूर्ण दिवसभर भाविकांची गर्दी येथे दिसून येते. या महोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कडक पोलीस बंदोबस्त व चेंगराचेंगरी होवू नये याकरिता संस्थानच्यावतिने भाविकांना शांततेत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: gurupurnima: Thousands of devotees gatherd in pohradevi