वांग्याचे दर घसरल्याने उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:21 PM2018-05-24T14:21:16+5:302018-05-24T14:21:16+5:30

पार्डी ताड: रखरखत्या उन्हात पाण्याचा काटकसरीने वापर करून राबराब राबत पिकवलेली वांगी आता फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Growers' distress due to drop in brinjols prices | वांग्याचे दर घसरल्याने उत्पादक अडचणीत

वांग्याचे दर घसरल्याने उत्पादक अडचणीत

Next
ठळक मुद्दे मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड शिवारातही या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु गेल्या दीड महिन्यापासून वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले.त्यातच १५ दिवसांपासून लग्नसराईसुद्धा बंद झाल्याने वांग्याची मागणीही घटली आहे.

पार्डी ताड: रखरखत्या उन्हात पाण्याचा काटकसरीने वापर करून राबराब राबत पिकवलेली वांगी आता फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या फळभाजीला बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांना वांग्यांची तोडणीही करणे पुरेनासे झाले आहे. पार्डी ताड परिसरात अनेक वांगी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. 
भाजीपाला वर्गीय पिकांत मागील काही वर्षांपासून बारमाही उत्पादन मिळणारे आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या वांग्याच्या पिकाची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. या पिकांवर मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. वरचेवर पाणी आणि खते देण्यासह तीन वेळा फवारणी केल्याशिवाय झाडांना फळधारणाच होत नाही. तथापि, या फळभाजीचा उठाव मोठा असल्याने सिंचन सुविधा असलेले शेतकरी या पिकाचा आधार घेत असतात. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड शिवारातही या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी वांग्याची लागवड केली आहे; परंतु गेल्या दीड महिन्यापासून वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच १५ दिवसांपासून लग्नसराईसुद्धा बंद झाल्याने वांग्याची मागणीही घटली आहे. बाजारात १० रुपये प्रति किलोदराने वांगी मिळू लागली असली तरी, ग्राहकच नसल्याने विके्र ते या मालाची मोजकीच उचल करीत आहेत. त्यामुळे लिलावातही शेतकऱ्यां च्या वांग्यांना मागणी मिळेनासी झाली असून, शेतकऱ्यांना आता शेतामधील वांग्यांच्या तोडणीवर खर्च करणेही पुरणारे नसल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Growers' distress due to drop in brinjols prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.