विक्री होत नसल्याने वांग्याच्या शेतात चारली जनावरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:09 IST2020-05-16T17:09:26+5:302020-05-16T17:09:55+5:30
एका शेतकºयाने चक्क एक एकरातील वांग्याच्या पिकात जनावरे चारल्याचा प्रकार शनिवारी घडला.

विक्री होत नसल्याने वांग्याच्या शेतात चारली जनावरे!
लोकमत न्यूज नेटवर्क
बांबर्डा कानकिरड (वाशिम) : लॉकडाऊनमुळे अपेक्षित दर न मिळण्यासह विक्री देखील होत नसल्याने बांबर्डा येथील एका शेतकºयाने चक्क एक एकरातील वांग्याच्या पिकात जनावरे चारल्याचा प्रकार शनिवारी घडला.
राज्यभरात ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून लॉकडाऊन लागलेला आहे. यामुळे इतर व्यवसायांसोबतच शेती व्यवसायही ठप्प झाला. यादरम्यान आठवडी बाजारातील भाजीपाला लिलाव बंद झाल्याने शेतातील भाजीपाला पिकांचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला. अशातच शासनाच्या वतीने भाजीपाला अत्यावश्यक सेवेत घेऊन विक्रीसाठी परवानगी देण्यात आली; मात्र काही शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकाची लागवड केल्यानंतरही वाहनात भरून गावोगावी भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. त्यामुळे अर्धाअधिक भाजीपाला शेतातच सडला, तर काही भाजीपाला पिकात जनावरे सोडण्याची वेळ कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड शेतशिवारातील शेतकºयांवर ओढवली आहे.
बांबर्डा येथील युवा शेतकरी नयन दिलीप कानकिरड यांनी दैनंदिन व्यवहारात नगदी पैसा हाताशी रहावा, या उद्देशाने शेतात भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली. हाच भाजीपाला विकून कुटुंबाचा चरितार्थ चालणार होता; परंतु लॉकडाऊनमुळे वांग्याची विक्री होत नसल्याने तसेच त्यावर खर्च करणे अवघड झाल्याने अखेर सदर शेतकºयाने एक एकरातील वांग्यात शनिवारी जनावरे सोडून चारली. या शेतकºयाचे जवळपास ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले.