शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीचा वाद, नातवानेच केला आजी-आजोबांचा घात; तीन मित्रांच्या मदतीने दोघांची हत्या!

By नंदकिशोर नारे | Updated: August 8, 2024 17:17 IST

चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

नंदकिशोर नारे, वाशिम : संपत्तीच्या वादातून नातवानेच तीन मित्रांच्या मदतीने आजी आणि आजोबांची हत्या करून त्यांना नदीपात्रात फेकून दिले. ही धक्कादायक घटना मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथे ४ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेची माहिती ७ ऑगस्टला मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या घटनेचा तपास करून आरोपी प्रतीक संतोष वीर याच्यासह त्याच्या तीन आरोपी मित्रांना अटक केली आहे.

मानोरा तालुक्यातील इंझोरीनजीक अडाण नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची फिर्याद तोरणाळा येथील पोलिस पाटील हरिदास प्रल्हाद राऊत यांनी ६ ऑगस्ट रोजी मानोरा पाेलिसात दिली होती. यावरून मानोराचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दरम्यान, हा मृतदेह सोमठाणा येथील प्रल्हाद दत्तराम वीर (७५ वर्षे) यांचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून संशयित आरोपी प्रतीक संतोष वीर याला मंगरुळपीर येथून ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपत्तीच्या वादातून मित्रांच्या मदतीने सोमठाणा येथील मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावरील एका इमारतीत ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजता आजोबा आणि आजी निर्मला प्रल्हाद वीर यांची हत्या करून दोघांचेही मृतदेह इंझोरीनजीकच्या पुलावरून अडाण नदीच्या पात्रात फेकून दिल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी प्रतीक संतोष वीर, जीवन फाळके, जगदीश अनिल देवकर व विकास भगत यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ (१), २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली.

एक किलोमीटर अंतरावर आढळला निर्मला वीर यांचा मृतदेहआरोपी प्रतीक वीर याने मित्रांच्या मदतीने आजोबा प्रल्हाद वीर व आजी निर्मला वीर यांची ४ ऑगस्ट रोजी हत्या करून त्यांना अडाण नदीच्या पात्रात फेकून दिल्याची कबुली दिली होती. त्यावरून पोलिसांनी निर्मला वीर यांचा मृतदेह शोधण्यासाठी पिंजर येथील आपत्कालीन पथकाला पाचारण केले. या पथकाने पुलापासून १ किलोमीटर अंतरावर निर्मला वीर यांचा मृतदेह शोधून काढला.

मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आजोबांच्याच वाहनाचा वापर

आरोपी प्रतीक वीर याने ४ ऑगस्ट रोजी मित्रांच्या मदतीने आजोबा प्रल्हाद वीर आणि आजी निर्मला वीर यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आजोबा प्रल्हाद वीर यांच्याच वाहनाचा वापर केल्याचेही पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीत सांगितले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी