ग्रामपंचायतसोबतच आता प्रभाग व जिल्हा परिषद गणालाही मिळणार स्वच्छतेचा पुरस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:16 IST2018-06-20T14:16:19+5:302018-06-20T14:16:19+5:30

  वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता  अभियानामध्ये आता ग्राम पंचायतीबरेबरच ग्रामपंचायतचे प्रभाग (वार्ड) आणि जिल्हा परिषद गणालादेखील सहभागी होता येणार  आहे. उत्कृष्ट प्रभाग आणि उत्कृष्ट जि. प. गणाला अनुक्रमे १० व ५० हजार रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत.

Gram Panchayat, the ward and the Zilla Parishad will get the cleanliness award too! | ग्रामपंचायतसोबतच आता प्रभाग व जिल्हा परिषद गणालाही मिळणार स्वच्छतेचा पुरस्कार !

ग्रामपंचायतसोबतच आता प्रभाग व जिल्हा परिषद गणालाही मिळणार स्वच्छतेचा पुरस्कार !

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्पर्धेत उत्कृष्ट प्रभागाला १० हजार आणि जि. प. गणाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, दुसरा पुरस्कार तीन लाख रुपये आणि तिसरा पुरस्कार दोन लाख रुपयांचा आहे.

 
वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता  अभियानामध्ये आता ग्राम पंचायतीबरेबरच ग्रामपंचायतचे प्रभाग (वार्ड) आणि जिल्हा परिषद गणालादेखील सहभागी होता येणार  आहे. उत्कृष्ट प्रभाग आणि उत्कृष्ट जि. प. गणाला अनुक्रमे १० व ५० हजार रुपयांचे पुरस्कार मिळणार आहेत. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी केले.
ग्रामिण भागातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. २५ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार या अभियानाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता ग्राम पंचायतमधील वार्ड, प्रभाग आणि जि.प. गणाला सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट प्रभागाला १० हजार आणि जि. प. गणाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. या अभियानांतर्गत देण्यात येणारा तालुकास्तरीय पुरस्कार आता सुधारित शासन निर्णयानुसार बंद करण्यात आला आहे. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पुरस्कार पुर्वीप्रमाणेचे आहेत. जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पाच लाख रुपये, दुसरा पुरस्कार तीन लाख रुपये आणि तिसरा पुरस्कार दोन लाख रुपयांचा आहे.
जुन ते सप्टेंबर या तीन महिन्यात सर्व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेची तयारी करावी. यानंतर१ ते ३०  आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी या स्पर्धेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी केले.

Web Title: Gram Panchayat, the ward and the Zilla Parishad will get the cleanliness award too!