रिसोड येथील पदवीधर युवकाने दहा गुंठे शेतात फुलविली फुलबाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 13:15 IST2020-10-04T13:15:18+5:302020-10-04T13:15:46+5:30
Gardening Risod farmer १० गुंठे शेतात गुलाब, मोगरा, निशीगंधा, शेवंती आदी फुलझाडांची लागवड केली.

रिसोड येथील पदवीधर युवकाने दहा गुंठे शेतात फुलविली फुलबाग !
- निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड येथील पदवीधर युवकाने पारंपारिक शेतीबरोबरच गत काही महिन्यांपासून दहा गुंठे क्षेत्रफळावर गुलाब, मोगरा, निशीगंधा, शेवंती आदी फुलशेती फुलवून इतरांसमोर आदर्श निर्माण केला.
विविध कारणांमुळे शेती करणे परवडणारे नाही, असे काही शेतकरी म्हणतात तर काही शेतकरी नानाविध प्रयोग करीत शेतीतून भरघोष उत्पन्नही घेत असल्याचे दिसून येते. रिसोड येथील नारायण शामराव गायकवाड या पदवीधर युवा शेतकऱ्याने वडिलोपार्जित सहा एकरपैकी १० गुंठे शेतात फुलशेती करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. सततची नापिकी व कोरडवाहू शेती यामुळे सहा एकरात अपेक्षीत उत्पादन होत नव्हते. यावर मात म्हणून १० गुंठे शेतात गुलाब, मोगरा, निशीगंधा, शेवंती आदी फुलझाडांची लागवड केली. कमी क्षेत्रफळावर फुलशेती फुलविल्यामुळे बाजारपेठ शोधण्याची गरज भासली नाही. गुलाब, मोगरा, निशीगंधा या फुलांना विशेष मागणी असते. या फुलशेतीतून बºयापैकी उत्पन्न मिळत असल्याने गायकवाड यांनी सांगितले. कुठल्याही प्रकारचे शेडनेट न उभारता फुलशेती फुलविल्याने इतर खर्चही कमी आला.