धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:26 IST2019-12-02T16:26:33+5:302019-12-02T16:26:57+5:30

रात्री ११ वाजताच्या सुमारास हाती धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली.

Grab a sharp weapon; All three were charged | धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल

धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरातील नागरतास वळणमार्गावरील साई आशिर्वाद ढाब्याजवळ शनिवार, ३० नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास हाती धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली. तीघांवरही विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
शनिवारी रात्री आशिर्वाद धाब्याजवळ तीन युवक हाती धारदार तलवारी घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाल्यावरून रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश बेलोकार व त्यांचे इतर सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी युवकांनी त्याठिकाणाहून पळ काढला; मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. संदिप बबन वानखेडे, कैलास प्रल्हाद हेंबाडे आणि प्रदिप बबन वानखेडे नामक या युवकांपैकी संदिप वानखेडे आणि कैलास प्रल्हाद हेंबाडे या दोघांच्या एका हातात लोखंडी तलवार; तर दुसºया हातात मॅन असल्याचे आढळून आले. तीन्ही आरोपींकडून शस्त्र आणि एक दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आले. पोलिस हेड कॉन्स्टेबल बेलोकार यांच्या फिर्यादीवरून तीघांवरही कलम ४/२५ आर्म अ‍ॅक्ट, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


५६ वर्षाच्या पोलिस कर्मचाºयाची अशीही कार्यतत्परता

शनिवारी रात्री आपल्या सहकार्यांसह गस्तीवर असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश मधुकर बेलोकार यांचे वय ५६ आहे; मात्र वयाचा आणि कर्तव्याचा काही संबंध नसल्याचे त्यांनी पटवून देत रात्रीच्या सुमारास आरोपी युवकांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. याप्रती त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Web Title: Grab a sharp weapon; All three were charged