शासकीय आश्रम शाळेचा २५० कुटुंबांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:20 IST2020-05-06T16:19:58+5:302020-05-06T16:20:06+5:30
किराणा मालाचे गरजु आदिवासी बांधवांना वितरण करुन मदतीचा हात देण्यात आला.

शासकीय आश्रम शाळेचा २५० कुटुंबांना मदतीचा हात
शेलुबाजार : शासकीय आश्रम शाळा शेलुबाजार १ ते ३ मे रोजी अन्नधान्य, किराणा मालाचे गरजु आदिवासी बांधवांना वितरण करुन मदतीचा हात देण्यात आला.
आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशीक यांच्याा आदेशान्वये, अप्पर आयुक्त विनोद पाटील अमरावती, यांचे सुचनेनुसार व उपआयुक्त नितीन तायडे आदिवासी विकास विभाग अमरावती व प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे एका आदिवासी विकास विभाग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा शेलुबाजार लगत आजगाव, पेडगाव, किसाननगर, पिंपळगाव हांडे, तसेच चिखली झोलेबाबा, येथील सुमारे २५० आदिवासी कुटूबांना गहू, तांदुळ, तुरदाळ, गोडेतेल, दाळी, कडधान्य, मिठ, मिरची, मसाला, हळद व गौवर्धन दुध पाकीट, अत्यंत बिकट परिस्थितीत असलेल्या कुटूबांचा सर्वे करुन त्यांना उपरोक्त वस्तुचे वाटप केले गेले. या प्रसंगी चिखली येथील सरपंच राजु पवार, तसेच सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग कोठाडे, शेलुबाजार तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान धोंगडे, सुभाष धोंगडे, राजु बायले व शाळेचे कर्मचारी, शिक्षक विनोद उजवणे, मस्के, निलेश पवार, पाटील, पंजाब चौधरी, उमेश राठोड, अमोल लोखंडे, प्रविण पाटील, श्रीमती नेवारे, जाने, व बेबी चौधरी, ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.
कोरोनाबाबत जनजागृती
मुख्याध्यापक संतोष काळपांडे सदर वाटपादरम्यान कोरोना संबंधी घ्यावयाची काळजी, सामाजिक अंतर स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली.शाळेचे अधिक्षक अनिल सावके यांनी परिसरातील सर्वे करुन गरजवंत आदिवासी बांधवांची निवड करुन धान्य वितरणाचे सुरेख नियोजन केले होते.