लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गोवर, रूबेला लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. या मोहिमेसंदर्भात अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडली.या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे, शंकरराव बोरकर, मोहन महाराज राठोड, हरिदास कोरडे, मालन बिजोरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती. गोवर आणि रूबेला हे संक्रामक आजार असून याचा संसर्ग कुणालाच होऊ नये याकरिता खबरदारी घेत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारा गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रम २०१८ वाशिम जिल्ह्यात आपण सर्वांच्या सहयोगातून १०० टक्के यशस्वीरित्या राबवू असा विश्वास यावेळी पदाधिकारी, अधिकाºयांनी व्यक्त केला. ९ महिने ते १५ वर्ष वयोगटात गोवर, रुबेलाची लक्षणे आढळून येत असून, गोवर या आजारामुळे शरिरातील प्रतिकार शक्ती झपाट्याने कमी होते. मुलांच्या शरीरात व्हिटॅमीन ए ची कमतरता जाणवते, अशी बालके आंधळी होण्याच्या धोका अधिक असल्याने गोवर रूबेला लसीकरण महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
गोवर, रुबेला लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 16:14 IST
वाशिम : जिल्ह्यात गोवर, रूबेला लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. या मोहिमेसंदर्भात अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडली.
गोवर, रुबेला लसीकरण मोहिम १०० टक्के यशस्वी करा
ठळक मुद्देमोहिमेसंदर्भात अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पार पडली.गोवर रूबेला लसीकरण महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.