वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतील मतदानास प्रतिसाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 14:26 IST2019-03-24T14:14:59+5:302019-03-24T14:26:36+5:30
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च रोजी नियोजित मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतील मतदानास प्रतिसाद!
वाशिम - राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी २४ मार्च रोजी नियोजित मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. दुपारी १ वाजतापर्यंत सरासरी ३० टक्के मतदान झाले होते.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील एकांबा, अडगाव खु., देवठाणा बु., जांभरुण नावजी, वांगी, सोयता, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन, बिटोडा, इचोरी, मानोरा तालुक्यातील बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु. दापुरा खु., ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बु., उमरी खु. या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तसेच जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी मतदान होत आहे. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित त्या-त्या मतदान केंद्रांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे.