गणपती बाप्पांना आज निरोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:20 IST2017-09-05T01:19:43+5:302017-09-05T01:20:24+5:30
वाशिम: २५ ऑगस्टपासून जिल्हय़ात मुक्कामी असलेल्या गणरायांना ५ सप्टेंबरपासून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. ५ ते ७ सप्टेंबर असे तीन दिवस टप्प्याटप्याने जिल्हय़ात श्री गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे.

गणपती बाप्पांना आज निरोप!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: २५ ऑगस्टपासून जिल्हय़ात मुक्कामी असलेल्या गणरायांना ५ सप्टेंबरपासून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. ५ ते ७ सप्टेंबर असे तीन दिवस टप्प्याटप्याने जिल्हय़ात श्री गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे.
जिल्हय़ात शहर विभागात २४५ तर ग्रामीण विभागात ४४१ असे एकूण ६८६ सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागात २१0 गावांमध्ये एक गाव-एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हय़ात पोलिसांवरील ताण कमी व्हावा, कोणतीही अनूचित घटना घडू नये याकरिता ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरपर्यंंत तीन टप्प्यात गणेश मूर्तींंचे विसर्जन करण्यात येणार आहे.
५ सप्टेंबर रोजी वाशिमसह काही ठिकाणी गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी मानोरा, मंगरुळपीर तर ७ सप्टेंबर रोजी ग्रामीण भागात कामरगावसह अन्यत्र श्रींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. तर दुसरीकडे गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेशभक्तही सज्ज आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत.
बचाव पथके तैनात, दारू विक्री बंद
गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने बचाव पथके तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी दिली. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी विसर्जनादरम्यान देशी व विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
कामरगाव येथे ७ सप्टेंबरला विसर्जन
कारंजा लाड: तालुक्यातील कामरगाव येथे ८ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ‘श्रीं’ची स्थापना करण्यात आली. गणेश मंडळाने शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासंदर्भात ठाणेदार व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या दोन बैठका घेण्यात आल्या. कामरगाव येथील गणेश विसर्जन येत्या ७ सप्टेंबर रोजी होत असून, गणेश विसर्जन मिरणुकीवर २६९ पोलिसांच्या ताफ्यासह करडी नजर राहणार आहे. गणेश उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून कलम १४४ नुसार २७ जनांवर व इतर ५ जणांवर तर एका जणांवर तडीपारची कार्यवाही पोलिसांनी केली आहे. विसर्जन मिरवणूक ही कामरगावातील लाकडे पुर्यांपासून सुरू होऊन स्मशानभूमीजवळील सार्वजनिक विहिरीत ‘श्रीं’चे विर्जसन होणार आहे. मिरवणुकीदरम्यान गणेश भक्तांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून कुठल्याही अफवेला बळी न पडता शांततेसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.