शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर चालला गजराज

By admin | Updated: February 7, 2015 02:17 IST

रिसोड येथे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने काढले अतिक्रमण.

रिसोड (वाशिम): रिसोड नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेस ६ फेब्रुवारीपासून पोलीस बंदोबस्तात प्रारंभ करण्यात आला. अनेक भागातील अतिक्रमणावर गजराज चालून इमारती उध्वस्त करण्यात आल्यात. दोन दिवसीय अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी शहरातील आंबेडकर चौक, ,गुरुवार बाजार, सिव्हील लाईन या भागामध्ये अतिक्रमणावर गजराज फिरविण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान कोणताही वाद होवू नये याकरीता शहरात सकाळी ११ वाजता पासून अतिक्रमण हटाव मोहीम पोलिस ताफ्यासह काढण्यास सुरुवात केली . अनेक अतिक्रमण धारकांनी स्वत:हा अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. काही क्षणातच गजबजलेला रस्ता मोकळा मोकळा झाला. गुरुवार बाजार मधील दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटल्याने रस्ता मोकळा झाल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. रस्त्याच्या बाजुला अतिक्रमणाने वेढा घातल्याने रहदारीचा मुख्य प्रश्न निर्माण झाला होता. यामार्गावर शाळा असल्यामुळे सतत वर्दळीचा रस्ता आहे. सदर रस्ता अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी नेहमीच जोर धरत होती. अखेर एकदा हा मार्ग मोकळा झाला. तसेच न.प.शाळेसमोरील रस्ता कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत होता. अखेर तोही प्रश्न आता निकालात निघाला आहे. न.प.शाळेला आता हक्काचा रस्ता प्राप्त झाला आहे. दोन्ही मार्गाला जोडणारा हा रस्ता ठरला आहे. उदया ७ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण हटाव मोहीम सिव्हील लाईन, वाशिम नाका, मालेगाव नाका या भागात राबविली जाणार आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये न.प.मुख्याधिकारी दीपक इंगोले, सहाय्यक पोलिस निरिक्षक विजयरत्न पारखी, नायब तहसीलदार सरनाईक, साबा विभागाचे अभियंता दांदळे, सह न.प.कर्मचारी , पोलिस मंडळी आदींनी सहकार्य केले आहे. दरम्यान रिसोड येथे विकासाच्या दृष्टीने व नागरिकांना अडचणी निर्माण होवू नये याकरता अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे अवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी स्पष्ट केले.