एक हजार भाविक करणार गजानन विजय ग्रंथाचे पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 14:50 IST2018-08-14T14:49:20+5:302018-08-14T14:50:31+5:30

मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

Gajananan Vijay Grantha Parayan, one thousand devotees will make it | एक हजार भाविक करणार गजानन विजय ग्रंथाचे पारायण

एक हजार भाविक करणार गजानन विजय ग्रंथाचे पारायण

ठळक मुद्देमुंबई येथील विद्या पडवळ यांना श्री गजानन विजय ग्रंथ मुखपाठ आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाविक संपूर्ण ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करणार आहेत.


लोकमत न्यूज नेटवर्क 
मालेगाव : येथील श्री गजानन महाराज भक्तांच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण १७ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात १ हजारावर भाविक सहभागी होणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गजानन भक्तांकडून करण्यात आलेले आहे
मुंबई येथील विद्या पडवळ यांना श्री गजानन विजय ग्रंथ मुखपाठ आहे. त्यांच्या वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम मालेगाव येथील श्री गजानन भक्तांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाविक संपूर्ण ग्रंथाचे मुखोद्गत पारायण करणार आहेत. या पारायणात एक हजारांहून अधिक पुरुष व महिला भाविक सहभागी होणार आहेत. या पारायणाला बसण्यासाठी भाविकांची नोंदणी झाली आहे. शुक्रवार दिनांक १७ आॅगस्ट रोजी या ग्रंथाचे पारायण करण्यात येणार आहे. पारायणादरम्यान भाविकांच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली असून, पारायणानंतर आरती व महाप्रसाद देण्यात येणार आहे. या पारायणात बसण्याची इच्छा असणाºयांनी नोंदणी करून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री गजानन भक्तांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Gajananan Vijay Grantha Parayan, one thousand devotees will make it