कारंजा दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 11:22 AM2021-03-21T11:22:49+5:302021-03-21T11:23:20+5:30

Fuss of the Corona Prevention Regulations नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमावली पायदळी तुडवित असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

Fuss of the Corona Prevention Regulations at the Karanja Secondary Registrar's Office | कारंजा दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचा फज्जा

कारंजा दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचा फज्जा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा  :  शहरात कोरोना रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. त्या दृष्टीने प्रशासन उपाययोजना करीत आहे. मात्र दुसरीकडे कारंजातील  दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी तसेच कार्यालयात येणारे नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमावली पायदळी तुडवित असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. 
कार्यालयात महत्वाच्या पदावर ठाण मांडलेले सहायक दुय्यम निबंधक अधिकारी मास्क लावून कामकाज करीत नाही. तसेच कार्यालयात येणारे नागरिक सुध्दा कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता या कार्यालयात गर्दी करित असल्याचे चित्र आहे. यावेळी अधिकारी व नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत नाहीत. खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी यवतमाळ, अमरावती, अकोला यासह पुणे, मुंबई येथे नागरिक  कार्यालयात येतात. त्यामुळे या कार्यालयातून कोराेना संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच  कार्यालयातील एका अधिकाऱ्याला काेराेनाची लागण झाल्यानंतरही  या कार्यालयात कोणत्याही प्रकारचे कोरोनाचे नियम पालन होत नसल्याचे पहावयास मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे  सॅनिटायझरचा उपयोग हाेत नसल्याचे दिसून आले. शहरातील प्लाॅट व्यावसायिक गर्दी करून नियमांचे पालन करीत नसल्यामुळे या कार्यालयातूनच काेराेनाच्या संक्रमणाचा धाेका वाढला आहे.

Web Title: Fuss of the Corona Prevention Regulations at the Karanja Secondary Registrar's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.