'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 11:39 AM2024-06-08T11:39:57+5:302024-06-08T11:41:11+5:30

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत दिग्गज मराठी कलाकारांची फौज असलेला आम्ही जरांगे सिनेमाची ट्रेलर भेटीला आलाय (amhi jarange)

amhi jarange movie trailer based on life of manoj jarange patil maratha reservation | 'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज

'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज

गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील.  गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमात प्रमुख भूमिकांमध्ये दिग्गज कलाकारांची फौज दिसतेय.

 'आम्ही जरांगे'  सिनेमाचा ट्रेलर

मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब जावळे यांच्यापासून सुरु झालेला हा संघर्षांचा इतिहास पाहायला मिळतोय.

सिनेमात दिग्गज कलाकार झळकणार

'आम्ही जरांगे' सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहेत. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकंच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत.

या तारखेला रिलीज होणार 'आम्ही जरांगे'

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या सिनेमाचे सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे.  चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.खऱ्या आयुष्यात मराठा समाजाची साथ मिळवल्यानंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील ह्यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल ह्यात काही शंका नाही. ''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'' सिनेमा १४ जूनला रिलीज होणार आहे.

Web Title: amhi jarange movie trailer based on life of manoj jarange patil maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.