वाळकी, बिटोडा येथे मोफत पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 13:27 IST2019-06-11T13:27:03+5:302019-06-11T13:27:26+5:30
वाशिम : मुंबई येथील विदर्भ वैभव मंदिर न्यासच्या वतीने जिल्ह्यातील वाळकी जहागीर व बिटोडा भोयर येथे टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळकी, बिटोडा येथे मोफत पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुंबई येथील विदर्भ वैभव मंदिर न्यासच्या वतीने जिल्ह्यातील वाळकी जहागीर व बिटोडा भोयर येथे टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.
अमरावती विभागातील जनतेला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून विदर्भ वैभव मंदिर न्यासने अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाळकी जहागीर आणि बिटोडा भोयर या दोन गावांचा समावेश आहे. या दोन गावांमध्ये १० जून रोजी उदघाटनाचा कार्यक्रम झाला. वाळकी येथील कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानोटे तर बिटोडा येथील कार्यक्रमाला मंगरुळपीरचे नायब तहसीलदार कुलकर्णी उपस्थित होते. सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त तथा विदर्भ वैभव मंदिर न्यासचे अध्यक्ष अशोक दौ. गोरे यांच्यासह आलेल्या चमुने