मोबाईल मेडिकल युनिटतर्फे रुग्णांची मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:58 IST2018-11-23T13:58:20+5:302018-11-23T13:58:51+5:30
किन्हीराजा : येथून जवळच असलेल्या मौजे खैरखेडा येथे मोबाईल मेडिकल युनिटतर्फे ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधी वाटप २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

मोबाईल मेडिकल युनिटतर्फे रुग्णांची मोफत तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा : येथून जवळच असलेल्या मौजे खैरखेडा येथे मोबाईल मेडिकल युनिटतर्फे ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधी वाटप २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. याचा गावातील महिला व पुरुषांनी लाभ घेतला.
यावेळी डॉ. शुभांगी अहिरे यांनी गावातील गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बाल व इतर महिला पुरुषांची आरोग्या तपासणी केली. यामध्ये १०८ रुगांना मोफत औषधिचे वितरण करण्यात आले. यावेळी औषधनिर्माता तौसिफ खान, तंत्रज्ञ राहुल बाजड, कर्मचारी स्मिता कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली होती.