वाशिम जिल्ह्यात आणखी चार जणांचा मृत्यू;  ३१४ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 11:33 IST2021-05-27T11:33:15+5:302021-05-27T11:33:23+5:30

Corona Cases in Washim : ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३१४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Four more killed in Washim district; 314 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी चार जणांचा मृत्यू;  ३१४ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी चार जणांचा मृत्यू;  ३१४ कोरोना पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम असून बुधवार, २६ मे रोजी आणखी ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३१४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३९१३१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र मृत्यूसत्र कायम असल्याने नागरिकांमध्ये थोडी धाकधूक कायम आहे. आणखी ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. बुधवारी नव्याने ३१४ रुग्ण आढळून आले तर ४१० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सर्वाधिक रुग्ण मंगरूळपीर तालुक्यात ७१ तर सर्वात कमी रुग्ण रिसोड तालु्क्यात ५६ आढळून आले आहेत. जिल्ह्याबाहेरील ३२ बाधितांची नोंद झाली आहे.  

Web Title: Four more killed in Washim district; 314 corona positive