शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख दस्तांचे स्कॅनिंग

By admin | Updated: February 14, 2015 02:04 IST

पहिल्या टप्प्यात चार तहसीलचा समावेश; रिसोड तहसील पूर्वतयारीत.

वाशिम : महत्त्वाच्या फाईल, कागदपत्रांचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागातर्फे सुरू असलेल्या ह्यस्कॅनिंगह्ण मोहिमेला कुठे गती तर कुठे उदासिनता असल्याचे वास्तव समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास १९ लाख २५ हजार दस्तऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत (दि.१३) चार लाख ३0 हजार दस्तऐवज स्कॅन झाल्याची माहिती आहे.तहसील कार्यालयांमधील रेकॉर्ड रुममध्ये असलेल्या दस्तऐवजांचे जतन करण्यासाठी ह्यस्कॅनिंगह्ण मोहीम सुरू आहे. शेतीसंबंधीची कागदपत्रे, जन्म-मुत्यूच्या नोंदीची कागदपत्रे, कोतवाल बुकाची नक्कल, पेरेपत्रक यासह विविध प्रकारचे दस्तऐवज वर्षानुवर्षे सांभाळण्याची जबाबदारी तहसील विभागावर सोपविण्यात आली आहे. या दस्तऐवजांचे कायमस्वरुपी जतन करण्यासाठी दस्तऐवज स्कॅन करण्याचे काम तहसील स्तरावर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव व मंगरुळपीर या चार तहसील कार्यालयांमधील दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. रिसोड तहसील कार्यालयाचा अपवाद वगळता उर्वरित तीनही तहसील कार्यालयाने दस्तऐवजांचे स्कॅनिंग करणे सुरू केले आहे. यामध्ये सर्वाधिक आघाडी वाशिम तहसील कार्यालयाने तर मालेगाव तहसील पिछाडीवर असल्याचे दिसून येते. वाशिम तहसील कार्यालयाने अडीच लाखाच्या वर तर मालेगाव तहसीलने ८0 हजाराच्या आसपास दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले आहे. रिसोड तहसील कार्यालय व भूमिअभिलेख कार्यालय संयुक्तरीत्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग करणार आहे. सुरूवातीला भूमिअभिलेख कार्यालयात स्कॅनिंग मोहीम सुरू आहे. त्यानंतर तहसील कार्यालयातील दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. पुर्वतयारी झाली असल्याची माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.