शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मानोऱ्यात महिला विनयभंगाच्या दोन घटनांत चौघांवर गुन्हा !

By admin | Updated: April 16, 2017 21:28 IST

मानोरा : मानोरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हट्टी आणि सोयजना येथे प्रत्येकी एका अशा एकूण दोन महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना १५ एप्रिल रोजी घडल्या.

मानोरा : मानोरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हट्टी आणि सोयजना येथे प्रत्येकी एका अशा एकूण दोन महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना १५ एप्रिल रोजी घडल्या. या प्रकरणी १६ एप्रिलला मानोरा पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीनुसार चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. यातील हट्टी येथील घटनेबाबत पोलिस सुत्राकडून प्राप्त माहितीनुसार  हट्टी येथील २७ वर्षीय महिला ११ एप्रिलच्या रात्री १० वाजता आपल्या मुलीसह घरात झोपली असताना आरोपी संतोष पवार व लक्ष्मण पवार रा.हट्टी यांनी वाईट उद्देशाने घरात प्रवेश करुन महिलेचा विनयभंग केला व मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत  सोमठाणा येथील विवाहीत महिला १५ एप्रिल रोजी  सकाळी ६.३० वाजता शेतातील विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता  आरोपी मनोहर  राठोड व विजय राठोड रा. सोयजना यांनी फिर्यादी महिलेस आम्हाला पाणी दे असे म्हणून वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.  दरम्यान तिचा पती येथे आला व याबाबत आरोपींना जाब विचारला असता, आरोपींनी पिडीत महिलेच्या पतीस मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी उपरोक्त दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३५४, ३२३, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास मानोरा पोलिस करीत आहेत.