शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुखही पक्षावर नाराज

By admin | Updated: October 11, 2014 01:16 IST

वाशिम जिल्ह्यात काँग्रेसला दुसरा धक्का

नंदकिशोर नारे /वाशिमकाँग्रेसमधील एका गटाच्या सापत्न वागणुकीमुळे पश्‍चिम विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुख पक्षावर नाराज आहेत. जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघावर पकड असलेले अकोल्याचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनीही पक्षावरील नाराजीतून कालच भाजप उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला. त्यापृष्ठभूमिवर आज अनंतराव देशमुखांनीही पक्षावर नाराजी व्यक्त केल्याने, काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण तापले असतांना, सर्वच पक्षात अफवांना ऊत आला आहे. त्याचप्रमाणे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची अफवाही वाशिममध्ये चर्चेत होती. यासंदर्भात अनंतराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, आपण पक्षाशी एकनिष्ठ असून कधीही, कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोब तच त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर तीव्र नाराजीही व्यक्त केली. रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होवून चार महिन्यांचा कालावधी उलटला. आपल्याला पक्षाकडून साधी विचारणाही करण्यात आली नाही. आता विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन एवढे दिवस उलटले तरी, पक्षाने आपल्याला कोणत्याही प्रक्रीयेत विश्‍वासात घेतले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रिसोड विधानसभा मतदारसंघात अनंतराव देशमुख प्रतिस्पर्धी उमेदवारास सहकार्य करीत असल्याची चर्चाही राजकीय वतरुळात रंगली आहे. त्यासंदर्भात विचारणा केली असता, अनंतरावांनी या आरोपाचे खंडण केले. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, बाबासाहेब धाबेकर यांच्या पाठोपाठ अनंतराव देशमुख, या जिल्ह्यातील दुसर्‍या दिग्गज काँग्रेस नेत्याने पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी कुणाला अडचणीत आणते आणि कुणाच्या पथ्यावर पडते, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.